७ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डी लीगला सुरुवात

    मुंबई : भारतातच्या कबड्डी विश्वातील सर्वात मोठ्या ‘प्रो कबड्डी लीग’ (Pro Kabbadi League) या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बंगळूरमधील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये या सीझनच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. तर २७ ऑक्टोबरपासून पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या लीग खेळवली जाईल. या स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्टस्‌ यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

    पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसांतच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. तसेच प्रो-कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दर शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत. कोरोनानंतर प्रो-कबड्डी लीगच्या लढती स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेसाठीच्या तिकिटाचे बुकिंग www.prokabaddi.com या सांकेतिक स्थळावर करता येणार आहे.

    सलामीची लढत गतविजेता दबंग दिल्ली (Dabbang Delhi)  विरुद्ध यू मुंबा (U Mumba) यांच्यामध्ये रंगणार आहे. तर त्याच दिवशी दुसरा सामना बंगळूर बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात तर युपी योद्धाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात तिसरा सामना खेळवण्यात येईल.