पंजाब आणि सीएसके आमनेसामने, कधी आणि कुठे पाहणार हाय-व्होल्टेज सामान?

गुणतालिकेची स्थिती पाहता चेन्नई सुपर किंग्स पाचव्या स्थानावर तर पंजाब किंग्सला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर त्यांना आजचा सामना जिंकले अनिवार्य आहे.

    पंजाब विरुद्ध सीएसके : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (Indian Premier League 2024) 53 वा सामना रंगणार आहे. आजच्या या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. गुणतालिकेची स्थिती पाहता चेन्नई सुपर किंग्स पाचव्या स्थानावर तर पंजाब किंग्सला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर त्यांना आजचा सामना जिंकले अनिवार्य आहे.

    PBKS विरुद्ध CSK सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
    इंडियन प्रीमियर 2024 चा 53 वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रविवार, 5 मे रोजी होणार आहे. आयपीएल 2024 चा 53 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात धर्मशाला येथील HPCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील IPL 2024 मधील 53 वा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर पंजाब किंग्स विरुद्ध सीएसकेचा थेट सामना पाहू शकता. तुम्ही Jio सिनेमा ॲपवर पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

    जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
    चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोललो, तर दोन्ही संघांमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 16 सामने CSK ने जिंकले आहेत, तर 13 सामने पंजाब किंग्जने जिंकले आहेत.