पंजाबला पहिला धक्का, शिखर धवन २१ धावा करून बाद; ५ षटकात ६०/१ धावा

दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत, त्यामुळे त्यांच्यात निकराची स्पर्धा अपेक्षित आहे. RCB बद्दल बोलायचे झाले तर, या संघाने १२ सामन्यात ७ सामने जिंकले आहेत आणि त्याचा नेट रन रेट -०.११५ आहे.

    नवी दिल्ली – आयपीएल २०२२ मध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ५ षटकांनंतर पंजाबची धावसंख्या ६०/१ आहे. जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहे. शिखर धवनने १५ चेंडूत २१ धावा करत ग्लेन मॅक्सवेलला विकेट दिली.

    दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत, त्यामुळे त्यांच्यात निकराची स्पर्धा अपेक्षित आहे. RCB बद्दल बोलायचे झाले तर, या संघाने १२ सामन्यात ७ सामने जिंकले आहेत आणि त्याचा नेट रन रेट -०.११५ आहे.

    PBKS ने११ पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि त्यांचा निव्वळ रन रेट -०.२३१ आहे. आरसीबीचे १४ गुण आहेत. ती जिंकली तर ती १६ गुणांसह टॉप-३ मध्ये येईल. पंजाबचे १० गुण आहेत आणि पराभव झाल्यास त्यांची प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच धुसर होईल.