
आयपीएलचा ३२ वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात मंगळवारी झाला. मॅच सुरू व्हायच्या काही तास आधी दीपक हुड्डाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. Here We Go असं कॅप्शन दीपक हुड्डाने या फोटोला दिलं.
दुबई : पंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा (Deepak Hooda) त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे एसीयूच्या रडारवर आला आहे. आयपीएलचा ३२ वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात मंगळवारी झाला. मॅच सुरू व्हायच्या काही तास आधी दीपक हुड्डाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. Here We Go असं कॅप्शन दीपक हुड्डाने या फोटोला दिलं. या फोटोमध्ये दीपक हुड्डाने हेल्मेट घातलं आहे, पण याच फोटोमुळे तो अडचणीत सापडला आहे.
Here we go?@PunjabKingsIPL #PBKSvRR #IPL2021 #SADDAPUNJAB pic.twitter.com/UfujNTU9QG
— Deepak Hooda (@HoodaOnFire) September 21, 2021
बीसीसीआयचं एण्टी करप्शन युनिट हुड्डाच्या या पोस्टची चौकशी करणार आहे. त्याने भ्रष्टाचारसंबधी नियमांचं उल्लंघन केलं आहे का नाही, हे एसीयू पाहणार आहे. टीमची प्लेयिंग इलेव्हन किंवा टीमची संरचनेबाबत अशाप्रकारे माहिती देण्यावर बंदी आहे. या पोस्टमधून आपण प्लेयिंग इलेव्हनमध्ये असल्याचं प्रेरित होत आहे, त्यामुळे दीपक हुड्डाच्या या पोस्टची चौकशी होणार आहे.