अश्विनच्या तक्रारीमुळे विराट कोहलीचा राजीनामा? BCCI वादावर तोडगा काढण्याची शक्यता

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० मधील चार सामन्यांमध्ये ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य दिले. जरी मैदानाची अवस्था ही फिरकीपटूंसाठी खराब दिसत होती. तरीसुद्धा विराटने जाडेजाला पसंती दर्शवली.

    भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनमुळे (R.Ashwin) विराट कोहलीने (Virat Kohli Resign) राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अश्विनने टी-२० (T-20) क्रिकेटपासून ते इतर सामन्यांमध्ये कमालीची भूमिका बजावली आहे. त्याची आकडेवारी सु्दधा प्रभावी आहे. परंतु भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० मधील चार सामन्यांमध्ये ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य दिले. जरी मैदानाची अवस्था ही फिरकीपटूंसाठी खराब दिसत होती. तरीसुद्धा विराटने जाडेजाला पसंती दर्शवली.

    तमिळनाडूच्या फिरकीपटूकडे दुर्लक्ष करण्याच्या कोहलीच्या निर्णयामुळे इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन आणि मायकेल वॉन यांच्यासारखे लोकही चकित झाले. यावर्षी इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यावर अश्विन बाकीच्या सहकाऱ्यांपासून दूर असल्याचे दिसत होता. तो अनेकदा ड्रेसिंग रूममध्ये किंवा स्टॅण्डमध्ये विचलित होऊन एकटा बसलेला दिसला होता.

    एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोहलीने इंग्लंडमध्ये सतत त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर, अश्विनने कर्णधाराविरोधात प्रश्न निर्माण केले आणि कोहलीने कठोर वागणूक दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.