टीम इंडियाचा अजिंक्य विक्रम, आर.अश्विनची विश्वविक्रमाला गवसणी, ऐतिहासिक कामगिरी…

अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑलराऊंड कामगिरी, बुमराह सिराज आणि अश्विनची बॉलिंग ही भारताच्या विजयाची मुख्य कारणं ठरली. या मॅचमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin) याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. या टेस्टमध्ये अश्विनने ५ विकेट घेतल्या आहेत.

मेलबर्न : भारताने (India vs Australia) मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अंजिक्य विक्रम केला आहे. अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑलराऊंड कामगिरी, बुमराह सिराज आणि अश्विनची बॉलिंग ही भारताच्या विजयाची मुख्य कारणं ठरली. या मॅचमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin) याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. या टेस्टमध्ये अश्विनने ५ विकेट घेतल्या आहेत.

अश्विनने जॉस हेजलवूडची विकेट घेताच नवीन विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. टेस्ट क्रिकेटमधला हा विक्रम आहे. याआधी मुथय्या मुरलीधरनच्या नावावर हा विक्रम होता. मुरलीधरनच्या८००विकेटपैकी १९१ विकेट या डावखुऱ्या बॅट्समनच्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंडरसनने १८६ डावखुऱ्या बॅट्समनना आऊट केलं. अश्विनने १९२ विकेट डावखुऱ्या बॅट्समनला टेस्टमध्ये आऊट केलं. टेस्ट क्रिकेटमधला हा विक्रम आहे.

वकारने टेस्ट क्रिकेटमध्ये ८७ टेस्ट मॅचमध्ये ३७३ विकेट घेतल्या होत्या. आता अश्विनचं लक्ष्य माल्कम मार्शल यांचा विक्रम मोडणं आहे. मार्शल यांनी ८६ टेस्टमध्ये ३७६ विकेट घेतल्या होत्या.