r madhavan and his son vedant

आर माधवनचा मुलगा वेदांत महादेवन (Vedaant Mahadevan won Silver at Danish Open 2022) याला डॅनिश ओपन २०२२ (Danish Open 2022) या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे.

    नवी दिल्ली : भारताच्या तरुण स्विमर्सनी डॅनिश ओपन २०२२ (Danish Open 2022) या स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये साजन प्रकाश याला सुवर्ण पदक मिळाले आहे. तसेच आर माधवनचा मुलगा वेदांत महादेवन (Vedaant Mahadevan won Silver at Danish Open 2022) याला रौप्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या या युवकांनी ही जबरदस्त कामगिरी केली आहे.

    जलतरणपटू साजन प्रकाशने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १:५९:२७ अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान याआधीची प्रकाशची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी १:५६:३८ वर आहे. तर अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन याने १५०० मीटर फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक कमावले आहे. हे पदक पटकावण्यासाठी त्याने आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे, त्याने १५:५७:८६अशी वेळ नोंदवत ही कामगिरी केली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by R. Madhavan (@actormaddy)

    आर माधवन याने इन्स्टाग्रामवर वेदांतला पदक मिळतानाचा व्हिडिओ पोस्ट करत मुलाचे कौतुक केले आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “वेंदात माधवनने भारतासाठी कोपनहॅगनमध्ये पार पडलेल्या Danish Open स्पर्धेसाठी रौप्य पदक जिंकले आहे. धन्यवाद प्रदीप सर. आम्हाला तुझा अभिमान आहे.”

    डॅनिश ओपन – 2022 ही स्पर्धा १५ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान कोपनहॅगनमध्ये पार पडत आहे. वेंदात आणि साजनसह शक्ति बालकृष्ण, तनिष जॉर्ज यांसारख्या खेळाडूंचं टॅलेंट भारतीयांना पाहता येणार आहे.