राहुल की गिल?, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी कसोटी; ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याचे भारताचे लक्ष्य, सामना कसा व कुठे पाहता येणार?

मालिकेत विजयी आघाडी घेण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील आपले स्थान पूर्णपणे निश्चित करण्याचे असेल. या कसोटीत भारतीय संघात एक दोन बदल होण्याची शक्यता आहे, शुभमन गिल किंवा मयांक अग्रवालला संधी मिळणार का? याची उत्सुकता क्रिक्रेटप्रेमीना लागली आहे.

इंदूर– ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा आजपासून तिसरा कसोटी सामन्याला (Test match) सुरुवात होत आहे. भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यात कांगारुंवर दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्राफीत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा इंदूरमधील होळकर स्टेडियमवर उतरेल, तेव्हा त्यांचा प्रयत्न मालिकेत विजयी आघाडी घेण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील आपले स्थान पूर्णपणे निश्चित करण्याचे असेल. या कसोटीत भारतीय संघात एक दोन बदल होण्याची शक्यता आहे, शुभमन गिल किंवा मयांक अग्रवालला संधी मिळणार का? याची उत्सुकता क्रिक्रेटप्रेमीना लागली आहे.

राहुलच्या जागी शुभमनला संधी?

भारताने पहिल्या दोन्ही कसोटीत प्रत्येकी ३ दिवसात विजय मिळवला होता. पण या दोन्ही कसोटीत सलामीवीर केएल राहुलच्या फलंदाजीबाबत खराब कामगिरी दिसली होती. त्यामुळं त्याच्या जागी शुभमन गिलला संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. कारण मागील दोन सामन्यात राहुलला फारशी चमक दाखवता आली नाही. यामुळेच तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया किमान एक तरी बदल करेल अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलला संघाबाहेर केले जाईल आणि त्याच्या जागी शुभमन गिलचा समावेश केला जाऊ शकतो.

गोलंदाजीत भारताच्या फिरकीचा वरचष्मा

पहिल्या दोन कसोटीच भारताच्या फिरकीपुढ कांगारुंनी नांगी टाकली त्यामुळं भारताची फिरकी भक्कम असल्याचं दिसून आलं. दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने कांगारुंचा दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या, तसेच अश्विन, अक्षर पटेल यांची गोलंदाजीत देखील धार आलेली आहे. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने गोलंदाजीत चमक दाखवण्यासह संघासाठी धावाही केल्या आहेत. वेगवान गोलंदाज शमी व मोहम्मद सिराजसह फिरकीला कांगारु कसे तोंड देतात हे पाहवे लागेल.

विराट, रोहित व पुजारा यांच्यावर मदार…

फलंदाजीकडे बघितले तर रोहितने पहिल्या कसोटी शानदार शकत ठोकल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. चेतेश्वर पुजाराने शंभर कसोटी सामने खेळला आहे, पण त्याला म्हणावा तसा सूर गवसला नाही. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. यानंतर त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके झाली, पण एकही शतक झाले नाही. तसेच पहिल्या कसोटीत कोहली लवकर बाद झाला होता. त्यामुळं या तीन फलंदाजा व्यतिरिक्त भरत यांच्याकडूनही चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. आपल्या १००व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने नाबाद ३१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल.

कांगारुंची भिस्त या खेळाडूंवर…

वॉर्नरच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजा ट्रॅव्हिस हेडसह डावाची सुरुवात करू शकतो. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यावर अवलंबून आहे. मिचेल स्टार्कसह अष्टपैलु कॅमेरून ग्रीन तंदुरुस्त दिसत आहेत. त्यामुळे अंतिम अकरामध्ये त्यांना संधी मिळू शकते. यासह ऑस्ट्रेलियन संघ नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुनमन या तिन्ही फिरकी गोलंदाजांसह सामन्यात उतरू शकते.

सामना कसा व कुठे पाहता येणार?

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ मार्च रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ९ वाजता नाणेफेक होईल. थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येईल. (संबंधित एचडी वाहिन्या)

भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा संघ-
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), एश्टन एगर, नाथन लियोन, मिचेल स्वेपसन, स्कॉट बोलँड