चेपॉकमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

चेन्नईकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने राजस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांना आपला बळी बनवले.

    चेन्नई विरुद्ध राजस्थान : इंडियन प्रीमियर लीग 2024चा (Indian Premier League 2024) 61वा सामना सुरु आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्या लढत सुरु आहे. राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 141 धावा केल्या. रियान परागने राजस्थानसाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 35 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47* धावा केल्या. या काळात चेन्नईकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने राजस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांना आपला बळी बनवले.

    सुपर संडेमध्ये आज डबल धमाका होणार आहे. सुपर संडेच्या या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात काही खास झाली नाही. जैस्वाल आणि बटलरने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली, परंतु ती अतिशय संथ गतीने आली, त्यानंतर राजस्थानला डावाच्या शेवटपर्यंत वेगवान धावा करता आल्या नाहीत. संघात उपस्थित असलेले अनेक दिग्गज आणि स्टार फलंदाज पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले.

    राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

    राजस्थान रॉयल्सचे सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ चेंडूंमध्ये 43 धावा धावांची भागीदारी केली. परंतु या दोन्ही सलामी फलंदाजांनी संथ सुरुवात केल्यामुळे फार मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. सिमरजीतने जैस्वालला आपला शिकार बनवले. यशस्वीने 21 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. त्यानंतर संथ गतीने खेळत असलेला जोस बटलरही 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वीनेच बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने 25 चेंडूत केवळ चौकारांसह 21 धावा केल्या. कर्णधार संजू आणि रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (37 चेंडू) भागीदारी केली. सिमरजीत सिंगने 15व्या षटकात या भागीदारीमध्ये डेंट केले आणि सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. ध्रुव जुरेलच्या रूपाने 131 धावांवर राजस्थानने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौथी विकेट गमावली. जुरेलने 18 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभम दुबे खाते न उघडता गोल्डन डकचा बळी ठरला. रियान पराग आणि रविचंद्रन अश्विन अखेरपर्यंत नाबाद परतले. रियानने ४७* आणि अश्विनने १* धावा केली.