टीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी

अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात येताच तालिबानने काबुलसह अफगाणिस्तानातील ६ मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर ताबा मिळवला आहे. यानंतर राशिद खानने ट्विट करून अफगाणिस्तानमधील क्रिकेट वाचवण्याचे जगाला आवाहन केले.

    राशिद खान दुबईत आहे, सराव करत आहे, इतर खेळाडूंसोबत मजा करत आहे. पण त्याचे सहकारी अफगाण क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान दिसत नाही. खरं तर, अफगाणिस्तानचं नवीन सरकार तालिबानने आयपीएल पाहण्यासाठी बंदी घातली आहे.

    अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात येताच तालिबानने काबुलसह अफगाणिस्तानातील ६ मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर ताबा मिळवला आहे. यानंतर राशिद खानने ट्विट करून अफगाणिस्तानमधील क्रिकेट वाचवण्याचे जगाला आवाहन केले. मग अफगाणिस्तानात घटना वेगाने बदलल्या. यावेळी तालिबान तोच तालिबान नाही ज्यांनी क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घातली.

    यावेळी तालिबान सरकारने१७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी -२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाची निवड केली. कर्णधार तो बनवला गेला जो सोशल मीडियावर सर्वात जास्त बोलत होता, म्हणजे रशीद खान. पण तालिबान्यांनी त्यांच्या देशात आयपीएल पाहण्यास बंदी घातली.