CSK ला जबरदस्त झटका! धोनीचा उत्तराधिकारी अपयशी; रवींद्र जडेजाने CSKचे कर्णधारपद सोडले

रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद परत देण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 सुरू होण्याच्या अवघ्या 2 दिवस आधी रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती( Ravindra Jadeja Resigns From CSK Captain ).

  रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद परत देण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 सुरू होण्याच्या अवघ्या 2 दिवस आधी रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती( Ravindra Jadeja Resigns From CSK Captain ).

  धोनीने प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले होते, परंतु गतविजेता असूनही चेन्नईच्या संघासाठी हा हंगाम चांगला राहिला नाही. पहिल्या 8 सामन्यात संघाला 6 पराभव पत्करावे लागलेत. त्यानंतर ते गुणांमध्ये  9व्या स्थानावर आहेत.

  शनिवारी 30 एप्रिल रोजी, CSK च्या 9व्या सामन्याच्या एक दिवस आधी, फ्रँचायझीने एक निवेदन जारी करून या बदलाची घोषणा केली. त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट केलेल्या या निवेदनात CSK ने म्हटले आहे की, “रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला CSK ची सूत्रे हाती घेण्याचे आवाहन केले आहे. महेंद्रसिंग धोनीने सर्वांचे हित लक्षात घेऊन CSK ची सूत्रे हाती घेण्याचे मान्य केले आहे, जेणेकरून जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल.

  सीएसकेला चार वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीने या मोसमाच्या दोन दिवस आधी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. जडेजा प्रथमच वरिष्ठ स्तरावर कर्णधार होता. नवीन कर्णधार आणि बदललेल्या संघामुळे CSK ची कामगिरी अत्यंत खराब झाली आणि संघाला फक्त पहिल्या 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

  यानंतर, त्यांना फक्त 2 विजय मिळाले, परंतु हंगामातील पहिल्या 8 सामन्यांमध्ये 6 पराभवानंतर, CSK गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. CSK चा पुढील सामना रविवार, 1 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे, ज्यामध्ये धोनी पुन्हा संघाची धुरा सांभाळेल.

  जडेजाची कामगिरीही खालावली

  संघच नाही तर खुद्द जडेजाचीही कामगिरी खराब झाली. गेल्या मोसमापर्यंत धडाकेबाज फलंदाजी करणारा जडेजा यावेळी अजिबात रंगात दिसला नाही. संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, जडेजाने 8 सामन्यात केवळ 112 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट देखील केवळ 121 होता. गोलंदाजीचा विचार केला तर येथेही परिस्थिती चांगली नव्हती आणि त्याला 8 सामन्यांत केवळ 5 विकेट मिळाल्या.