IPL 2024: Kaif tells RCB the formula to win IPL, see what exactly needs to be done

RCB Team : भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने RCB संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कैफने सांगितले आरसीबीला आयपीएलचे जेतेपद जिंकायचे असेल, तर त्यांना कोणती एकमेव गोष्ट करावी लागेल, वाचा सविस्तर....

  नवी दिल्ली : आयपीएलचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, आता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या आरसीबी संघाच्या आशा उंचावल्या आहेत. आरसीबीचा संघ हा गेल्या १७ वर्षांपासून खेळत आहे. पण आतापर्यंत आरसीबीच्या संघाला एकही जेतेपद जिंकता आलेले नाही. आरसीबीला जर जेतेपद जिंकायचे असेल तर त्यांनी काय करायला हवं, याचा फॉर्म्युला आता भारताचा माजी क्रिकेटपटू मौहम्मद कैफने दिला आहे. आरसीबीने फक्त एकच गोष्ट केली तर त्यांना आयपीएल जिंकता येऊ शकते, असे आता कैफने सांगितले आहे.

  एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना, मोहम्मद कैफने आरसीबीवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. कैफने म्हटले होते की, “आरसीबी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये वाईट खेळला, पण त्यानंतर त्यांनी चांगले पुनरागमन केले आहे. आरसीबी सलग सहा पराभावानंतर संघ खूप मागे पडला होता. या कारणामुळे त्यांच्या संघाला दुसरा विजय एका महिन्यानंतर मिळाला आणि हे त्यांना आता जड जात आहे. सलग सहा सामने गमावल्याचा फटका त्यांना बसला आहे. आरसीबीने जर सलग सहा सामने गमावले नसते तर ते आता सहजपणे प्ले ऑफमध्ये गेले असते. पण आरसीबीला जर आयपीएल जिंकायची असेल तर त्यासाठी त्यांना एक गोष्ट करावी लागेल.”

  भारतीय खेळाडू मिळवून देतील ट्रॉफी
  कैफने आरसीबीला विजयाचा फॉर्म्युला सांगताना म्हटले आहे की, ” आरसीबीने भारतीय खेळांना संधी दिली पाहिजे. आरसीबीच्या संघात विदेशी खेळाडूंना संधी द्यायचे वेड आहे. मॅक्सवेल सारख्या खेळाडूविना कसे जिंकायचे हे आता त्या संघाला कळले आहे. यामधून त्यांना धडा मिळाला आहे. भारतीय खेळाडूंना संघात घेतले पाहिजे, जे त्यांना जेतेपद मिळवून देतील. कोलकाताने हेच केले. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल यांना संघात घेतले. त्यामुळे आरसीबीने खेळाडू ओळखणे गरजेचे आहे व त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आरसीबीला जर आयपीएल जिंकायचे असेल तर त्यांनी भारतीय खेळाडूंना सर्वात जास्त संधी द्यावी, ही एक गोष्ट त्यांनी केली तर नक्कीच त्यांना जेतेपद जिंकता येऊ शकते.”

  आरसीबीने अनुभवातून शिकले पाहिजे
  मोहम्मद कैफने पुढे म्हटले आहे की, “आरसीबीचा संघ खूप वाईट खेळला. सलग सहा सामने हरणे म्हणजे ते स्पर्धेत एका महिन्यात एका विजयापासून लांब राहिले. याच कारणामुळे स्पर्धेत ते खूप मागे पडले. त्यांनी केलेल्या शानदार कमबॅकचे कौतुक केले पाहिजे. आरसीबीला आपल्या अनुभवातून शिकण्याची गरज आहे.”
  भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने आरसीबी संघाला भविष्यात आयपीएलचे जेतेपद मिळवण्यासाठी काय केले पाहिजे या बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. १७ वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जेतेपदाची वाट बघत आहे. जर बंगळुरूला जेतेपद जिंकायचे असल्यास भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवण्याचा सल्ला कैफने दिला आहे.