आरसीबीच्या आशा दिनेश कार्तिकवर, विजयासाठी ६ षटकांत ९२ धावांची गरज

प्रत्युत्तरात आरसीबीने १४ षटकांत ५ गडी गमावून ११८ धावा केल्या. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद क्रीजवर आहेत. विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने १४ चेंडूत ३३ धावा केल्या आणि कागिसो रबाडाने त्याला बाद केले.

    मुंबई – आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ९ गडी गमावून २०९ धावा केल्या. पंजाबसाठी इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी धुवांधार खेळी खेळली.

    लियाम लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत ७० धावा केल्या. त्याचवेळी जॉनी बेअरस्टोने २९ चेंडूत ६६ धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने ४ बळी घेतले. वानिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या.

    प्रत्युत्तरात आरसीबीने १४ षटकांत ५ गडी गमावून ११८ धावा केल्या. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद क्रीजवर आहेत. विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने १४ चेंडूत ३३ धावा केल्या आणि कागिसो रबाडाने त्याला बाद केले.

    रबाडाने चौथ्यांदा विराटची विकेट घेतली आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही फार काही करता आले नाही. तो ८ चेंडूत १० धावा करून ऋषी धवनचा बळी ठरला. दोन्ही वेळी पंचांनी नॉट आऊट दिले. चेंडू बॅटला लागल्याचे रिव्ह्यूवरून स्पष्ट झाले. महिपाल लोमरलाही ऋषी धवनने बाद केले. रजत पाटीदारने २६ धावा करत राहुल चहरला विकेट दिली. हरप्रीत ब्रारने ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली.