football
football

''हे फुटबॉल नाही, हे आहे लालिगा'' – असे स्‍थळ जेथे जगातील अग्रणी क्‍लब्‍स एकमेकांना आव्‍हान करतात, जेथे सर्वात प्रतिभावान फूटबॉलपट्टू खेळतात

  मुंबई: ”हे फुटबॉल नाही, हे आहे लालिगा” – असे स्‍थळ जेथे जगातील अग्रणी क्‍लब्‍स एकमेकांना आव्‍हान करतात, जेथे सर्वात प्रतिभावान फूटबॉलपट्टू खेळतात – सर्व निष्‍ठावान चाहत्‍यांकडून स्‍टार फुटबॉलपट्टूंची प्रशंसा केली जाते आणि चाहते देखील स्‍टार फुटबॉलपट्टू बनण्‍याचे स्‍वप्‍न पाहतात. पण यामध्‍ये अनेक भावना देखील सामावलेल्‍या असतात, जेथे लालिगा ही जगातील सर्वाधिक फॉलो केली जाणारी चॅम्पियनशीप आणि टॅलण्‍ट आणि प्रतिष्‍ठेसाठी ओळखली जाणारी जागतिक पोहोच असलेली स्‍पर्धा आहे.

  याच कारणांमुळे बीकेटीने कोणताही football, Sport News संकोच न करता सीझन २०२४/२०२५ च्‍या अखेरपर्यंत ऑफिशियल ग्‍लोबल पार्टनर म्‍हणून ला लिगा डी फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) सोबत सहयोग सुरू ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा अविश्‍वसनीय करार बीकेटीला सॉकर प्रेक्षकांसोबत जगाच्‍या कानाकोप-यामधील सर्व घरांमध्‍ये घेऊन जातो.

  ऑफ-हायवे टायर्समध्ये विशेषीकृत भारतीय बहुराष्‍ट्रीय कंपनी वर्षानुवर्षे विविध क्रीडांमधील अनेक चॅम्पियनशीपचे प्रायोजक म्हणून आंतरराष्‍ट्रीय क्रीडा जगतात प्रसिद्ध आहे. सॉकर व्यतिरिक्त बास्केटबॉल, क्रिकेट आणि रग्बी हे खेळ देखील आहेत – कारण कंपनी क्रीडाकडे बहुविध क्षमतांचे एक अप्रतिम साधन म्‍हणून पाहते. क्रीडा बीकेटीला ब्रॅण्‍ड जागरूकता वाढवण्‍यास मदत करते, तसेच ते भावना व सकारात्मक मूल्ये, मुख्यतः सांघिक व सहकार्याची भावना आणि समावेशन देखील जागृत करते. या अशा थीम आहेत, ज्या बीकेटीला प्रोत्‍साहित करतात आणि कंपनी जगभरात त्‍यांचा संवाद, प्रसार व प्रचार करते.

  पण, स्‍पॅनिश सॉकरसोबतचा हा सहयोग एक करार आहे, जो असाधारण व उत्‍कट उत्‍साहाच्‍या अवतीभोवती फिरतो. २०१९ मध्‍ये सुरू झालेला हा सहयोग समान मूल्‍यांवर आधारित आहे, जेथे स्‍टेडियम्‍समध्‍ये व स्‍टेडियम्‍सशिवाय प्रामाणिक खेळ असे ऐकायला मिळते व जाणवते.

  खरेतर, बीकेटी व लालिगा यांनी प्रेक्षक व प्रतिस्‍पर्धींसाठी आदरावर, कटिबद्धता व निर्धारावर, आव्‍हाने स्‍वीकारण्‍यावर, चिकाटी व सातत्‍यावर आणि शेवटचे पण महत्त्वाचे म्‍हणजे सांघिक कार्यावर आधारित क्रीडा संस्‍कृतीचा प्रसार करण्‍याच्‍या इच्‍छेने सहयोग केला आहे.

  बीकेटी युरोपच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लुशिया साल्‍मासो म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला लालिगासोबतचा सहयोग कायम ठेवण्‍याचा आनंद होण्‍यासोबत अभिमान वाटतो. मला अभिमान वाटतो की आम्‍ही संबंधित बाजारपेठांमधील दोन महत्त्वाच्‍या कंपन्‍या आहोत, ज्‍या सुलभ मार्केटिंग कार्यसंचानालासह संयुक्‍त व परस्‍पर प्रेरणेला चालना देतात. आता बाजारपेठ संपूर्ण जग आहे. जागतिक स्‍तरावर कार्य करण्‍यासाठी समान भाषा व्‍यापक समुदायांपर्यंत पोहोचण्‍यास आवश्‍यक आहे. आणि यासंदर्भात क्रीडापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण काय असू शकते?”

  लालिगाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी ऑस्‍कर मायो म्‍हणाले, ”मागील तीन वर्षांपासून लालिगा व बीकेटी यांच्‍यामधील सहयोगाने आम्‍हाला चाहते व प्रेक्षकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांना त्‍यांची जागतिक उपस्थिती वाढवण्‍यामध्‍ये मदत केली आहे. आम्‍ही दोघे करणाऱ्या प्रत्‍येक कामामध्‍ये सर्वोत्तमतेला प्राधान्‍य देतो आणि नवीन चक्रासाठी या सहयोगाचे नूतनीकरण करण्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे.”

  हा सहयोग बीकेटीसाठी धोरणात्‍मक निवड आहे, जेथे कंपनीसाठी स्‍पेन ही धोरणात्‍मक बाजारपेठ असण्‍यासोबत युरोपमधील, विशेषत: कृषीमधील प्रमुख बाजारपेठ आहे. बीकेटी विविध स्‍पेशालिस्‍ट क्षेत्रांसाठी अनुकूल टायर्स देते, पण कृषी क्षेत्रातील युजर्ससोबतच्‍या प्रत्‍यक्ष अनुभवामुळे आज बीकेटी सर्वात प्रख्‍यात ब्रॅण्‍ड आहे. लालिगा डी फुटबॉल प्रोफेशनलसोबतचा सहयोग व्‍यावसायिक दृष्टीकोनामधून बहुप्रतिक्षित चालना देणारा ठरू शकतो.

  लालिगा स्‍पेनसोबत जगभरात भावना व्यक्‍त करते, ज्‍यामुळे बीकेटी १६० हून अधिक देशांमध्‍ये त्‍यांच्‍या उत्‍पादनांसह उपस्थित राहत लाखो उत्‍साहींपर्यंत पोहोचू शकते.

  ”हा सहयोग आम्‍हा दोघांना स्‍पेनमधील आमची उपस्थिती व ब्रॅण्‍ड जागरूकता प्रबळ करण्‍याची संधी देतो. आम्‍ही व्‍यवसायासंदर्भात या देशाला धोरणात्‍मकरित्‍या अत्‍यंत महत्त्वपूर्ण मानतो,” असे लुशिया साल्‍मासो म्‍हणाल्‍या. ”खेळाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही लक्षवेधक चॅनेलच्‍या माध्‍यमातून आमच्‍या युजर्सपर्यंत पोहोचू शकतो, कारण क्रीडा ही सुलभ व प्रत्‍यक्ष भाषा आहे, जी सर्वजण समजू शकते आणि म्‍हणूनच वैश्विक आहे.”