T20 World Cup च्या शर्यतीत ऋषभ पंत आघाडीवर? आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

पंतसोबतच टीम इंडिया इशान किशन आणि केएल राहुलवरही लक्ष ठेवणार आहे. ऋषभने गुजरात टायटन्सविरुद्ध 43 चेंडूंचा सामना करत नाबाद 88 धावा केल्या.

    ऋषभ पंत : इंडियन प्रीमियर लीगचा हा सिझन सध्या दमदार वेगात सुरु आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघाची चांगलीच कसरत सुरु आहे. कालचा पार पडलेल्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सच्या संघाला चार धावांनी पराभव केले. ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध स्फोटक खेळी खेळली आणि सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले आहे. वरुण आरोनचा असा विश्वास आहे की पंतने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. जर आपण आयपीएल 2024 मधील पंतची कामगिरी पाहिली तर तो फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही चांगला आहे.

    पंतसोबतच टीम इंडिया इशान किशन आणि केएल राहुलवरही लक्ष ठेवणार आहे. ऋषभने गुजरात टायटन्सविरुद्ध 43 चेंडूंचा सामना करत नाबाद 88 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 8 षटकार मारले. या इनिंगमध्ये ऋषभचा स्ट्राइक रेट 204.65 होता. त्याने आयपीएल 2024 मध्ये KKR आणि CSK विरुद्ध अर्धशतकेही झळकावली होती. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतने 9 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. नाबाद 88 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

    T20 विश्वचषकासाठी पंतला प्राधान्य

    टीम इंडियाची निवड समिती 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी इशान किशन, केएल राहुल आणि पंत यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. या तिन्ही खेळाडूंमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर तो पंत आहे. त्याने यष्टिरक्षणातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंतने या मोसमात 10 झेल घेतले आणि 3 यष्टिरक्षणही केले. राहुलही स्पर्धेत आहे. त्याने 8 सामन्यात 302 धावा केल्या. राहुलने 9 झेल आणि 2 स्टंप घेतले आहेत. ईशान सध्या या शर्यतीत मागे पडला आहे.