चेपॉकमध्ये ऋतुराजचा पुन्हा एकदा ‘राज’; लखनऊपुढे चेन्नईचे आव्हान

आयपीएल 2023 (IPL 2023) मधील सहावा सामना चेन्नईत खेळला जात आहे. चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी मोलाचे योगदान दिले.

लखनऊ : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील सहावा सामना चेन्नईत खेळला जात आहे. चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी मोलाचे योगदान दिले. चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 बाद 217 धावा केल्या. त्यानुसार, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाने 2019 नंतर प्रथमच घरच्या मैदानावर उतरताना एलएसजीला (LSG) 218 धावांचे लक्ष्य दिले.

चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमवून 217 धावा केल्या. लखनऊसमोर विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊला प्रत्येक षटकात 10.9 च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. सीएसकेच्या डावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे केली. दोघांनी आपल्या संघाला शानदार सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड 57 धावांवर बाद झाला. त्याने 31 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि 4 षटकार लगावले.

चेन्नई सुपर किंग्सने शानदार सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले आहेत. डेव्हॉन कानवे आणि ऋतुराज गायकवाड सलामी जोडीने 110 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर चेन्नईने झटपट ठराविक अंतराने 4 विकेट्स गमावल्या. चेन्नईचे ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि मोईन अली हे 4 फलंदाज आऊट झाले आहेत.