रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम, वयाच्या ४३ वर्षे ६ महिन्यांत इतिहास रचणारा पहिलाच खेळाडू… यूएस ओपन विजेतेपदापासून एक पाऊल दूर

सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

    रोहन बोपण्णा : भारताचा एक टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांनी गुरुवारी यूएस ओपनच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली. रोहन बोपण्णा याने इतिहास रचला आहे. त्याचबरोबर त्याने विश्वविक्रमही केला. याआधी या वयामध्ये इतर कोणताही खेळाडू खुल्या युगामध्ये कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचलेलं नाही. एकूणच रोहनने अंतिम फेरी गाठणे हे ऐतिहासिक आहे. भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.

    रोहन आणि एबडेन यांनी पियरे-ह्युग्स हर्बर्ट आणि निकोलस माहुत या फ्रेंच जोडीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. बोपण्णा याने त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला आहे. सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

    या जोडीने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत फ्रेंच जोडीचा ७-६ (७-३), ६-२ असा पराभव केला. रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे, त्याने याआधी शेवटचा २०१० मध्ये त्याचा पाकिस्तानी साथीदार इसम-उल-हक कुरेशीसह यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर कुरेशीसह रोहनची जोडी ब्रायन बंधूंकडून पराभव पत्करावा लागला होता. रोहन बोपण्णा सामना जिंकल्यानंतर खूप आनंदी दिसत होता. त्यांनंतर तो म्हणाला, “जेव्हा आम्ही पहिल्या सेटमध्ये ब्रेक पॉइंट वाचवल्यानंतर दुहेरी ब्रेकमध्ये जाणे टाळले तेव्हा ते खूप महत्त्वाचे होते. आम्हाला गर्दीतून खूप ऊर्जा मिळाली. मी १३ वर्षांनंतर अंतिम फेरीत परतलो आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” असे रोहन बोपण्णा म्हणाला.