रोहित शर्माने क्रिकेट निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

रोहित शर्मा कधी पर्यत खेळणार? तो कधी निवृत्त होणार? अजून किती दिवस तो क्रिकेट खेळणार? असे अनेक प्रश्न सध्या नेटकरी त्याला सोशल मीडियावर विचारत असतात.

    रोहित शर्मा : नुकताच युट्युबवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंटरनॅशनल गायक एड शिरन गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये दिसले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा जवळपास ३७ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा कधी पर्यत खेळणार? तो कधी निवृत्त होणार? अजून किती दिवस तो क्रिकेट खेळणार? असे अनेक प्रश्न सध्या नेटकरी त्याला सोशल मीडियावर विचारत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तर आता रोहित शर्माने या शोमध्ये दिली आहेत. त्याचबरोबर त्याला पुढे त्याच्या क्रिकेटच्या या प्रवासामध्ये काय करायचे आहे ते सुद्धा सांगितले आहे.

    रोहित शर्माची निवृत्तीबाबत प्रतिक्रिया
    गौरव कपूरच्या शोमध्ये त्याला निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्याने सांगितले की, मी सध्या चांगला खेळत आहे, त्यामुळे पुढील काही वर्षे क्रिकेट खेळत राहण्याचा मी विचार करत आहे… मला विश्वचषक जिंकायचा आहे, त्याआधी वर्ल्डकप खेळायचा आहे. टेस्ट चॅम्पियनशिप 2025 जावे लागेल, मला वाटते भारत जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल. खरे तर, नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव केला.