आयपीएलमध्ये रोहित शर्माचा नवीन विक्रम, एमएस धोनी आणि विराटला सुद्धा टाकले मागले

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी दिल्लीविरुद्ध विजय मिळवत धोनी आणि कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकत एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. जाणून घेणार आहोत रोहितने कोणता विक्रम करीत एमएस धोनी आणि कोहलीला मागे टाकले आहे. तसेच या विक्रमात रोहितच्या तुलनेत धोनी आणि कोहली कुठे उभे आहेत ते पाहा.

    नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे आणि तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर (मॅन ऑफ द मॅच) असलेला भारतीय खेळाडू बनला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून कर्णधारपदाची खेळी खेळत असलेल्या रोहित शर्माने आपल्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला आणि 19व्यांदा सामनावीर ठरला. आयपीएलमधील भारतीय खेळाडूंचा हा विक्रम आहे.

    भारतीय खेळाडूंपैकी सर्वाधिक वेळा सामनावीर :

    मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे, ज्याने 17 वेळा सामनावीराचा किताब जिंकला आहे. त्याचबरोबर स्फोटक फलंदाजांमध्ये गणल्या जाणार्‍या युसूफ पठाणनेही 16 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. यासोबतच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा सुरेश रैना आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहली यांनी 14-14 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावण्यात यश मिळवले आहे.

    पाहुया इतर दिग्गज खेळाडूंचे सामनावीर पद :

    दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, गौतम गंभीरला 13 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे, तर लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलसह अनेक खेळाडू 12-12 वेळा प्लेअर ऑफ द मॅच बनले आहेत. . अशाप्रकारे, लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल व्यतिरिक्त, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू अमित मिश्रा यांच्या नावाचाही 12 वेळा सामनावीर ठरलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे.

    सर्वाधिक सामनावीर ठरणारे खेळाडू 

    तसे, जर आपण आयपीएलच्या एकूण रेकॉर्डवर नजर टाकली तर, एबी डिव्हिलियर्स या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने 25 वेळा सामनावीराचा किताब जिंकला आहे. यानंतर ख्रिस गेलने 22 वेळा हा पराक्रम केला आहे. रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.

    रोहित पहिल्यांदा या संघाकडून सामनावीर :

    रोहित शर्माला पहिल्यांदा 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सने आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली होती. यानंतर 2009 मध्ये रोहितने पहिला सामनावीराचा किताब पटकावला. त्यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा आपल्या संघात समावेश केला होता. तेव्हापासून तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडू बनला आहे.