रोमेनियाच्या गतविजेत्या सिमोना हालेपची विम्बल्डन स्पर्धेतून माघार, काय आहे कारण?

पायाला झालेल्या दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरू न शकल्याने मी विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगताना दुःख होत आहे. विम्बल्डनमध्ये खेळता यावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी मी ही स्पर्धा जिंकले होते आणि यंदा गतविजेती म्हणून या स्पर्धेत मी खेळण्यासाठी उत्सुक होते. परंतु, मला शरीराने साथ दिली नाही, असे हालेप तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाली. यंदा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला २८ जूनपासून सुरुवात होणार आहे.

    रोमेनियाच्या गतविजेत्या सिमोना हालेपने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. मागील महिन्यात हालेपच्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून ती अजून पूर्णपणे सावरू शकलेली नाही. त्यामुळे तिला विम्बल्डनमधून माघार घेणे भाग पडले आहे. तसेच तिला सलग दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

    विम्बल्डनमध्ये खेळता यावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले