Ronaldo also 'champion' on Instagram; The only player with 300 million followers

ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव प्रत्येक फुटबॉल चाहत्यासाठी एखाद्या देवासारखे आहे. फुटबॉलच्या मैदानात नव नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पोर्तुगालच्या या स्टारच्या खात्यात आणखी एका विक्रम जमा झाला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोवर्सचा आकडा हा 300 मिलियनच्या घरात पोहचला आहे. इन्स्टाग्रामवर एवढ्या मोठ्या प्रमाणात फोलोवर्स असणारा तो जगातील एकमेव व्यक्ती आहे. यामागोमाग हॉलीवूड अभिनेता आणि माजी डब्लूडब्लूई खेळाडू ड्वेन जॉनसनचे इन्स्टाग्रामवर 246 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव प्रत्येक फुटबॉल चाहत्यासाठी एखाद्या देवासारखे आहे. फुटबॉलच्या मैदानात नव नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पोर्तुगालच्या या स्टारच्या खात्यात आणखी एका विक्रम जमा झाला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोवर्सचा आकडा हा 300 मिलियनच्या घरात पोहचला आहे. इन्स्टाग्रामवर एवढ्या मोठ्या प्रमाणात फोलोवर्स असणारा तो जगातील एकमेव व्यक्ती आहे. यामागोमाग हॉलीवूड अभिनेता आणि माजी डब्लूडब्लूई खेळाडू ड्वेन जॉनसनचे इन्स्टाग्रामवर 246 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    युनायटेड, रियल माद्रिद यासारख्या प्रतिष्ठित क्लबकडून खेळताना रोनाल्डोने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मैदानातील दमदार कामगिरीसह त्याच्या चाहत्यात दिवसागणिक वाढ होताना दिसली. रोनाल्डोने पोर्तुगाल संघाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही काही खास विक्रम आपल्या नावे केले आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तिंमध्ये रोनाल्डो हा टॉपवर आहे.

    मार्च 2019 ते मार्च 2020 या कालावधीत रोनाल्डोने स्पॉन्सर पोस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. रोनाल्डोने 50.3 मिलियन डॉलर इतकी कमाई इन्स्टाग्रामच्या माध्यामातून केली आहे. ही रक्कम सध्याचा त्याचा क्लब युवेंट्सने त्याला वेतन स्वरुपात दिल्या जाणाऱ्या 33 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो हा आघाडीवर आहे.

    2021 मध्ये त्याने 120 मिलियन डॉलर इतकी कमाई केली. पोर्तुगाल स्टार युवेंट्स क्लबसोबत 4 वर्षांसाठी करारबद्ध झाला. या क्लबकडून त्याला 64 मिलियन डॉलर प्रतिवर्ष मिळतात. फुलबॉलमधून मिळणारी सॅलरी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याच्याशिवाय त्याला अन्य काही ब्रँड्सकडून मोठी रक्कम मिळते.