आज रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ घाना विरुद्ध उतरणार मैदानात

यंदाचा फिफा विश्वचषक ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी खूप महत्वाचा आहे. 37 वर्षीय रोनाल्डोचा हा या विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो स्पर्धेतील आपल्या संघाचे वर्चस्व कसे कायम ठेवतो हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. आज होणाऱ्या या सामन्याचा विचार केल्यास अर्थातच रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचं पारडं जड आहे.

    कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा अतिशय रंगतदार होत चालली आहे. फुटबॉल मधील जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आज त्याच्या पोर्तुगाल संघाला घेऊन फिफा विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. यावेळी पोर्तुगाल संघासमोर घाना संघाचे आव्हान असणार असून या सामन्याकडे फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

    मंगळवारी मेस्सीच्या बलाढय अशा अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाकडून दारुण पराभव झाला होता. सौदी अरेबियाचा संघ अर्जेंटीनाला हरवू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र असे घडले आणि सौदी अरेबिया संघाने मेस्सीच्या अर्जेन्टिनाला २-१ ने मात दिली. त्यामुळे आता ख्रिस्तियानो रोनाल्डो स्पर्धेतील आपल्या संघाचे वर्चस्व कसे कायम ठेवतो हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. आज होणाऱ्या या सामन्याचा विचार केल्यास अर्थातच रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचं पारडं जड आहे. सध्या फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर आहे तर घानाचा संघ तब्बल ६१ व्या स्थानी आहे.

    यंदाचा फिफा विश्वचषक ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी खूप महत्वाचा आहे. 37 वर्षीय रोनाल्डोचा हा या विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोर्तुगाल संघातील रोनाल्डो सह बर्नार्डो सिल्वा (bernardo silva), ब्रुनो फर्नांडीस (bruno fernandes) या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.घानाकडे थॉमस पार्टी (thomas partey) आणि मोहम्मद कुदुससारखे (mohammed kudus) खेळाडू आहेत ज्यांनी युरोपियन क्लबसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    कुठे पहाल सामना ?

    आज रात्री ९:३० च्या दरम्यान हा सामना सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील फिफा विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.