royal challengers bengluru twitter account hacked

आरसीबीचे ट्वीटर अकाउंट हॅक (RCB Twitter Account Hack) होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर 2021 मध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्वीटर अकाउंट हॅक झालं होतं. पण नंतर फ्रँचायझीने ते नीट करुन घेतले.

    आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challengers Banglore) अधिकृत ट्वीटर अकाउंट आज हॅक झाल्याची घटना समोर आली. हॅकर्सनी आरसीबीच्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव बदलून ‘बोर्ड एप यॉट क्लब’ असं केलं होतं. हॅकर्सनी आरसीबीच्या ट्वीटरचं बायोआणि प्रोफाईल फोटो देखील बदलला होता. हॅकर्सनी बायोमध्ये लिहिलं की, सदस्य होण्यासाठी OpenSea वर म्युटंट एप खरेदी करा. पण हॅकर्सच्या काही विचित्र ट्वीटनंतर नेकऱ्यांनी लवकरच ही गोष्ट उघडकीस आली. विशेष म्हणजे, RCB ने अद्याप हॅकर्सनी ट्वीट केलेला मजकूर काढून टाकलेला नाही किंवा फ्रँचायझीने ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचं दरम्यान त्याच्या ट्वीटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. त्याच वेळी, फ्रँचायझीचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले गेले आणि हॅकर्सनी विचित्र पोस्ट शेअर केल्याने त्यांचे फॉलोवर्सही आश्चर्यचकित झाले. आरसीबीचं ट्वीटर अकाउंट हॅक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केलेले काही ट्वीट्स पाहू.

    आरसीबीचे ट्वीटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर 2021 मध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्वीटर अकाउंट हॅक झालं होतं. पण नंतर फ्रँचायझीने ते नीट करुन घेतले. पण 21 जानेवारीला हॅक झालेले ट्वीटर अकाउंट आरसीबीने अद्याप रिस्टोअर केलेलं नाही. ट्वीटरवर आरसीबीचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. अकाऊंट सप्टेंबर 2009 मध्ये तयार केले गेले. आरसीबी 585 लोकांना फॉलो देखील करते.