आयपीएल २०२१ मध्ये रनमशीन विराट कोहली ओपनिंग करणार

विराटने ५२ चेंडूत नाबाद ८० धावा करत इंग्लंडला २२५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिलं होतं. त्याला उत्तर म्हणून पाहुण्या संघाने निर्धारित षटकात केवळ १८८ धावा केल्या आणि भारताने पाचवा सामना ३६ धावांनी जिंकला. सोबत टी- २० मालिकाही ३-२ ने जिंकली. टी -२० वर्ल्ड कपची तयारी पाहता कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून सलामीला येणार आहे.

    अहमदाबाद : पाचव्या आणि निर्णायक टी -२० सामन्यात सलामीवीर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला. सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतर आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल विराटने मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माबरोबर सलामीला आलेल्या विराटने स्फोटक आणि निर्णायक खेळी केली. त्यामुळे आता आयपीएल २०२१ मध्येही ओपनिंगला उतरणार असल्याचं विराटने म्हटलं आहे.

    विराटने ५२ चेंडूत नाबाद ८० धावा करत इंग्लंडला २२५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिलं होतं. त्याला उत्तर म्हणून पाहुण्या संघाने निर्धारित षटकात केवळ १८८ धावा केल्या आणि भारताने पाचवा सामना ३६ धावांनी जिंकला. सोबत टी- २० मालिकाही ३-२ ने जिंकली. टी -२० वर्ल्ड कपची तयारी पाहता कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून सलामीला येणार आहे.

    इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही ५ सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली.