रुपल चौधरीने अॅथलेटिक्समध्ये जिंकली २  पदके

    भारताची अॅथलीट रुपल चौधरीने (जागतिक अंडर- २० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Athletics Championship) दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे. रुपल या चॅम्पियनशिपमध्ये (Rupal Chaudhary) दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असून तिच्या या नव्या विक्रमाने सर्वस्थरातून तिचे कौतुक होत आहे. रुपलने पहिल्या ४X४०० मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर तिने महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे.

    शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी तरी रुपल चौधरीने जागतिक २० वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४X४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकले. भारताच्या बार्थ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रुपल चौधरी यांनी ३ मिनिटे १७. ७६ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि नवीन आशियाई ज्युनियर विक्रमही केला. या शर्यतीनंतर गुरुवारी रुपलने ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले. रुपलने ५१.८५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

    रूपल ही उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील एका लहान गावात राहणारी असून तिचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. अवघ्या १७ वर्षांची असणारी रुपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली. तिने ज्युनियर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ दाखवला.रुपल एका लहान गावात मोठी झाली असल्याने तिच्या गावात कोणतीही मुलगी धावण्याच्या शर्यतीत भाग घेत नसायची, मात्र रुपलने हार न मानता तिने २०१६ साली अॅथलीट होण्याचे ठरवले आणि जिद्द तसेच मेहेनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे