Tendulkar shares video of his father's memory; Pandya, Rashid also became emotional

जगभर रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या आठवणीत हा व्हिडीओ शेअर केला असून यात त्याने त्याच्या वडिलांची एक जपून ठेवलेली गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओत तो एका झोपाळ्याबाबत सर्वांना माहिती देत आहे.

    मुंबई : जगभर रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या आठवणीत हा व्हिडीओ शेअर केला असून यात त्याने त्याच्या वडिलांची एक जपून ठेवलेली गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओत तो एका झोपाळ्याबाबत सर्वांना माहिती देत आहे.

    विशेष म्हणजे तो झोपाळा त्याच्या वडिलांचा पाळणा असून कायम तो त्याच्यासोबत राहावा, त्याला तो वापरता यावा यासाठी त्याने त्याचा झोपाळा करुन घेतला असल्याचेही त्याने व्हिडीओमध्ये सांगितले. सचिन हे सांगत असताना भावूकही झाला तसेच त्याने या झोपाळ्यात बसल्यावर आपुलकी वाटते, एक वेगळी एनर्जी येते असेही सांगितले.

    पांड्या, राशिदही झाले इमोशनल

    टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि अफगाणिस्तानचा बॉलर राशिद खान हे देखील वडिलांच्या आठवणीने इमोशनल झाले. या दोघांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. राशिद खानने वडिलांचा फोटो शेअर करुन वडिलांचा मार्गदर्शक हाथ नेहमी माझ्या खांद्यावर असेल, अशी भावना व्यक्त केली आहे. तर हार्दिक पांड्यानं भाऊ कृणाल पांड्यासह वडिलांचा फोटो शेअर केला आहे. वडिलांनी आम्हाला कर्तव्याबाबत शिकवले. त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शनामुळेच आम्ही इथवर आलो आहोत असे हार्दिक म्हणाला.