21व्या शतकातील सर्वोत्तम फलंदाज ठरला सचिन तेंडुलकर ; ‘या’ दिग्गज क्रिकेटरनं दिली जोरदार लढत

सचिन तेंडुलकरची 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट बॅट्समन म्हणून निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी सचिनला श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने जोरदार लढत दिली. दोघांनाही समान पॉईंट्स मिळाले होते.

    महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आठ वर्ष झाली आहेत. सचिननं त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले. वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम आजही सचिनच्या नावावर आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं. पण सचिनचा दबदबा आजही कायम आहे.

    सचिन तेंडुलकरची 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट बॅट्समन म्हणून निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी सचिनला श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने जोरदार लढत दिली. दोघांनाही समान पॉईंट्स मिळाले होते.

    मात्र या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सदस्यांनी सचिनला जास्त मतं दिली. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे (WTC Final) अधिकृत ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ नं शनिवारी या पुरस्काराची घोषणा केली.