पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराला हृदयविकाराचा झटका, सचिन ट्वीट करत म्हणाला…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला (inzamam-ul-haq) काल (सोमवार) हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तात्काळ लाहोरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे.

    पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला (inzamam-ul-haq) काल (सोमवार) हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तात्काळ लाहोरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे. तसेच इंझमामची प्रकृती स्थिर असून या घटनेनंतर क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar ) spo इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे.

    सचिनने लिहिले की, ‘इन्झमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे आहे. तू नेहमीच शांत पण मजबूत आणि मैदानावर एक फायटर राहिला आहेस. मी आशा आणि प्रार्थना करतो, की तू या परिस्थितीतून बाहेर पडशील. लवकर बरा हो. अशी ट्विट सचिनने आपल्या मित्रासाठी केली आहे.