सचिन तेंडुलकरचा मुलगा घेतोय युवराजच्या वडिलांकडून ट्रेनिंग

    क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतरही मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करताना दिसत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) काल गुरुवारी झालेल्या एका सामन्यात सचिनने गोलंदाजांना धुधू धुतले. मात्र क्रिकेटचा देव आणि भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू असणारा सचिनचा मुलगा हा माजी क्रिकेटर युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या वडिलांकडून क्रिकेटचे धडे गिरवताना पहायला मिळत आहे.

    अर्जुनला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या दरम्यान मुंबई इंडियन्स संघात तो दिसला होता मात्र त्याला खेळण्याची संधी काही मिळाली नाही.

    अर्जुन हा गोलंदाज असून तो सध्या माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. २२ सप्टेंबरपासून चंदीगड येथे आयोजित २७ व्या अखिल भारतीय जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत अर्जुन तेंडूलकर भाग घेत आहे. युवराज सिंगचे वडिल अर्जुनला नेटमध्ये क्रिकेटचे सगळे डावपेच शिकवताना दिसत आहेत.