विराट कोहली आऊट झाल्यावर दिसला दु:खी, सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्हायरल

पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतरची प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे. विराट खूप निराश दिसला आणि आकाशाकडे बघत पॅव्हेलियनमध्ये परतला.

  Virat Kohli Reaction: IPL 2022 मध्ये विराट कोहलीची खराब कामगिरी कायम आहे. विराट कोहली हा बंगळुरूच्या संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे, पण कोहलीचा वाईट काळ संपत नाही. पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट स्वस्तात बाद झाला. यावेळी आऊट झाल्यानंतर तो खूपच निराश दिसला, आकाशाकडे बघून विराट रागात काहीतरी बोलताना दिसला.

  विराट कोहली मैदानावर दु:खी दिसत होता

  पंजाब किंग्जविरुद्ध 14 चेंडूत 20 धावा करून विराट कोहली बाद झाला. या सामन्यात कोहलीने 2 चौकार आणि 1 षटकारही लगावला. विराट फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र चौथ्या षटकात विराट कागिसो रबाडाचा बळी ठरला. राहुल चहरकरवी झेलबाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि खूपच निराश दिसला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट रागाने आकाशाकडे बघत काहीतरी बोलताना दिसला, त्याने दोन्ही हात आकाशाकडे उंचावून काहीतरी सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  पंजाब किंग्जनेही ट्विट केले आहे

  या सामन्यात विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर पंजाब किंग्जनेही ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये पंजाब किंग्सने लिहिले की, ‘विराट कोहली, अगदी आम्ही एन्जॉय केला. नशीब लवकरच तुम्हाला साथ देईल अशी आशा आहे!’ विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये परतावा, अशी पंजाब किंग्ज संघाचीही इच्छा आहे. विराटची अशी प्रतिक्रिया पाहून चाहतेही निराश झाले.

  IPL मध्ये 6500 धावा पूर्ण केल्या

  विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलच्या 6500 धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासात 6500 धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. या सीझनबद्दल बोलायचे झाले तर आयपीएल 2022 मध्ये विराट कोहली तीनदा शून्यावर बाद झाला आहे आणि त्याने फक्त 1 अर्धशतक झळकावले आहे. या मोसमात त्याचा स्ट्राइक रेटही 113.46 आहे.