
राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022)आठव्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अक्षरशः पदकांचा पाऊस पडला आहे. भारताची स्टार कुस्तीपटू (Wrestler) साक्षी मलिकने (Sakshi Malik) फ्री स्टाईल ६२ किलोग्राम गटात सुवर्णपदकाची (Gold Medal) कमाई केली आहे. अंतिम सामन्यात कॅनडाच्या अँना गोंझालेजला धूळ चालत राष्टकुल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पदक पटकावत हॅट्रिक केली आहे. यापूर्वी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकाची कामे केली होती.
साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार फॉर्ममध्ये होती. फ्री स्टाईल ६२ किलोग्राम गटात तिने राऊंड 16 पासून उत्तम खेळ दाखवत एक-एक फेरी गाठली. सेमीफायनलमध्ये साक्षीने इंग्लंडच्या खेळाडूला मात देत फायनल गाठली आणि भारतासाठी एक पदक निश्चित केले. पण हे पदक सुवर्णच असावं यासाठी सारे प्रयत्न केले आणि ते यशस्वी करुन दाखवत अखेर फायनलमध्ये कॅनडाच्या अँना गोंझालेजला मात देत सुवर्णपदक मिळवलं.
विशेष म्हणजे फायनलचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला होता. एका क्षणी ४-० च्या आघाडीवर अँना होती पण साक्षीने जोरदार कमबॅक करत स्कोर ४-४ असा बरोबरीत आणला आणि अखेर विजय मिळवला.
SAKSHI WINS GOLD 🤩🤩
Rio Olympics 🥉medalist @SakshiMalik (W-62kg) upgrades her 2018 CWG 🥉 to🥇 at @birminghamcg22 🔥
What a Comeback 🤯 VICTORY BY FALL 🔥
With this Sakshi wins her 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇🥉🥈
Medal in all 3️⃣colors 😇#Cheer4India
1/1 pic.twitter.com/vsRqbhh890— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022