
महिलांच्या उपांत्य सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीवर सरळ दोन सेटमध्ये २५-१६, १९-११ असा विजय मिळवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
अलिबाग : कमळ नागरी सहकारी पतसंस्था आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडीगावकर, अंबिका हरिथ, संदीप दिवे, प्रशांत मोरे अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या उपांत्य सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीवर सरळ दोन सेटमध्ये २५-१६, १९-११ असा विजय मिळवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सेटमध्ये पाचव्या बोर्डनंतर काजल १६-० अशी आघाडीवर होती. परंतु पुढील तीन बोर्डात समृद्धीने बाजी उलटवली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत मुंबईच्या अंबिका हरिथने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरवर १९-१, २५-८ अशी सहज मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
कमळ नागरी सहकारी पतसंस्था आयोजित प्रथम राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याच्या सागर वाघमारेवर २३-८, २०-१३ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने पुण्याच्या माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १४-२५, २५-१०, २५-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.