भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सानिया सोशल मीडियापासून दूर

सानियाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. शोएब टी -20 विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तान संघाचा सदस्य आहे. यापूर्वी मलिकची संघात निवड झाली नव्हती, पण तो सोहेब मकसूदच्या जागी परत आला आहे.

  टी -20 विश्वचषक (T20 World Cup) रणसंग्रामाला आजपासून सुरूवात होत आहे. टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) होणार आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) या सामन्याच्या दिवशी सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. सामन्यादरम्यान खराब वातावरण टाळण्यासाठी सानियाने हा निर्णय घेतला आहे. कारण तिचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) पाकिस्तानकडून खेळतो आणि सानिया भारताची आहे.

  सानियाने सोशल मीडियावर काय लिहिलंय ?

  सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी वाद टाळण्यासाठी मी सोशल मीडियावरून दूर जाणार आहे. बाय बाय.’

  View this post on Instagram

  A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

  सानियाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. शोएब टी -20 विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तान संघाचा सदस्य आहे. यापूर्वी मलिकची संघात निवड झाली नव्हती, पण तो सोहेब मकसूदच्या जागी परत आला आहे.