
सात्विक-चिरागने दक्षिण कोरियाच्या चोई सोलग्यु आणि किम वोंहो यांना सरळ गेममध्ये पराभूत करून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक मिळवून दिले.
सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी : सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच नवीनतम BWF क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली. २०२३ हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळवून भारतीय जोडीने क्रमवारीत अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केला आहे. सात्विक-चिरागने दक्षिण कोरियाच्या चोई सोलग्यु आणि किम वोंहो यांना सरळ गेममध्ये पराभूत करून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक मिळवून दिले.
सात्विक आणि चिराग यांनी या वर्षी १८ स्पर्धांमधून एकूण ९२४११ गुण मिळवले आहेत, जे दुसऱ्या स्थानावर असलेल्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांटो यांच्यापेक्षा २००० गुणांनी पुढे आहेत. आशियाई खेळांमध्ये भारताच्या या जोडीने दमदार कामगिरी करत इतिहास घडवला. त्याचबरोबर मलेशिया, चीन च्या दिग्गज खेळाडूंना पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. काही दिवसांपूर्वी भारताची ही जोडी BWF च्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी आता २००० गुणांची आघाडी घेत पहिल्या स्थानावर उडी मारली आहे.