पाकिस्तानातील सुरक्षा ठरतेय ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची डोकेदुखी

    कराची : इंग्लंडचा संघ (England Team) सध्या सात टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा संघ (Shri Lanka) पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan )असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे कोणताही संघ बरेच वर्ष पाकिस्तानात जाऊन क्रिकेट सामने खेळला नव्हता. मात्र आता पाकिस्ताननेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली असून सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळात आहे. मात्र यावेळी पाकिस्तानमध्ये मिळणारी अतिसुरक्षा इंग्लंडच्या खेळाडूंची डोके दुखी बनली आहे.

    इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने (Harry Brooke) सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाला आहे. मॅचनंतर हॅरी ब्रूक गंमतीने म्हणाला, मी प्रत्येक वेळी टॉयलेटमध्ये जातो तेव्हा कोणीतरी माझा पाठलाग करत असतो. मी याआधी असे काहीही अनुभवले नव्हते, पण छान आहे. आम्हाला इथे खूप सुरक्षित वाटते. आम्ही सर्वजण पाकिस्तान दौऱ्याचा आणि या कडक सुरक्षेचा आनंद घेत आहोत.

    मोठ्या संघांचे सातत्याने आगमन होत असल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटची स्थिती सुधारत आहे. पुढील वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. याशिवाय २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनही करायचे आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे कोणतीही घटना घडू नये आणि त्यामुळे यजमानांचे नुकसान होऊ नये असे पाकिस्तानला वाटते.