सेहवागचं BCCI वर शरसंधान, सीएसकेच्या फलंदाजावर हा अन्याय का ?

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅमचा चेंडू चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज डेव्हॉन कॉनवेच्या पॅडला लागला, त्यानंतर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद केले.

  DRS Controversy : गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज डेव्हन कॉनवे या सामन्यात LBW आऊट झाल्यानंतर DRS वापरू शकला नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडे DRS होते.

  सीएसकेच्या फलंदाजावर हा अन्याय झाला

  मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅमचा चेंडू चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज डेव्हॉन कॉनवेच्या पॅडला लागला, त्यानंतर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट केले. चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडे DRS उपलब्ध होते, परंतु पॉवर कट झाल्यामुळे DRS उपलब्ध नव्हते, त्यामुळे डेव्हन कॉनवे शून्यावर बाद झाला आणि त्याला परतावे लागले.

  वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयवर उपस्थित केले प्रश्न

  या डीआरएस वादानंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘क्रिकबझ’शी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘पॉवर कटमुळे डीआरएसचा वापर झाला नाही, हे मोठे आश्चर्य आहे. IPL सारख्या मोठ्या T20 लीगमध्ये जनरेटरचा वापर केला जाऊ शकतो.’

  जनरेटर का वापरत नाही?

  वीरेंद्र सेहवाग टोमणे मारत म्हणाला, ‘सॉफ्टवेअर जनरेटर वापरून चालवता येते आणि डीआरएस वापरला जातो. हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. जर वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटरचा वापर फक्त लाइटसाठी केला जातो आणि ब्रॉडकास्टरसाठी नाही? मी आश्चर्यचकित झालो. मॅच असेल तर डीआरएस वापरावा किंवा संपूर्ण सामन्यात डीआरएस नसेल असा नियम बनवला पाहिजे.

  चेन्नई सुपर किंग्जची गैरसोय झाली

  वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे नुकसान झाले, जर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली असती तर त्यांना याचा फटका सहन करावा लागला असता.’ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा संघ 97 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने 14.5 षटकांत सामना जिंकला.