IPL 2021 सूरू होण्यापूर्वीच शाहरूख खानच्या टीमला लागली मोठी लॉटरी, KKRचा ट्रिकर खेळाडू बॅक

शाहरूखच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला मोठी लॉटरी लागली आहे. केकेआरचा ट्रीकर खेळाडू आणि ओपनर बॅट्समन शुभमन गील (Shubman Gill) पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये संघात फलंदाजी करणार आहेत.

    नवी दिल्ली: आयपीएल २०२१ (IPL 2021)च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रत्येक संघातील खेळाडू आपला फॉर्म चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करण्यासाठी कठीण मेहनत घेत आहे. परंतु शाहरूखच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला मोठी लॉटरी लागली आहे. केकेआरचा ट्रीकर खेळाडू आणि ओपनर बॅट्समन शुभमन गील (Shubman Gill) पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये संघात फलंदाजी करणार आहेत.

    चांगल्या फॉर्ममध्ये तो पुन्हा एकदा संघात

    कोलकाता नाईट रायडर्सचा ओपनर आणि फलंदाज शुभमन गील इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना Injury झाली होती. त्यामुळे गील एकही कसोटी सामना खेळू शकला नाही. परंतु तो आता एकदम फिट झाला आहे. तसेच चांगल्या फॉर्ममध्ये तो पुन्हा एकदा संघात खेळण्यासाठी तयार झाला आहे. मागील हंगामात गीलने इतकी खास कामगिरी केली नव्हती. त्यामुळे आता चांगलं प्रदर्शन करण्यासाठी त्याला सुवर्णसंधी आहे.