Shah Rukh's investment in another league Abu Dhabi Knight Riders win ownership

इंडियन प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि अमेरिकेतील लीगनंतर शाहरूख खानचा मालकी हक्क असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक केली आहे(Shah Rukh's investment in another league).

    मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि अमेरिकेतील लीगनंतर शाहरूख खानचा मालकी हक्क असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक केली आहे(Shah Rukh’s investment in another league).

    अभिनेता शाहरूख खानने नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये नाईट रायडर्स ग्रुपने फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत आणि अबुधाबी नाईट रायडर्स असे या संघाचे नाव असणार आहे(Abu Dhabi Knight Riders win ownership).

    इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 2008मध्ये कोलकाता नाईट रायडर्स रूपाने शाहरूख खानने ट्वेंटी-20 लीगमध्ये एन्ट्री मारली. त्यानंतर 2015 मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सचे हक्क या फ्रँचायझीने मिळवले आहे.

    नुकतेच नाईट रायडर्स ग्रुपने अमेरिकेत होऊ घातलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये गुंतवणूकीची घोषणा केली आणि लॉस एंजलीस नाईट रायडर्स नावाने संघ मैदानावर उतरणार आहे. नाईट रायडर्स ग्रुपमध्ये शाहरूखसह बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला व तिचे पती जय मेहता यांचेही शेअर्स आहेत.