घटस्फोट दिल्यानंतर Shikhar Dhawan ने उचललं महत्त्वाचं पाऊल, सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर भज्जीने टाकली गुगली…

सलामीवीर शिखर धवन आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅपचा होल्डर आहे. त्याने आतापर्यंत या हंगामाच्या 10 सामन्यांमध्ये 430 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे, ज्या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 आहे. तसेच शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

  नवी दिल्ली: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर शिखर धवनला (Shikhar Dhawan) घटस्फोटनंतर मोठा धक्का बसला होता. त्याला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) तब्बल 8 वर्षांच्या नात्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर धवनला दोन मोठे धक्के बसले होते. आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021 (ICC T20 World Cup 2021) मध्ये टीम इंडियासाठी (Team India) त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं.

  ऑरेंज कॅपचा होल्डर आहे गब्बर…

  सलामीवीर शिखर धवन आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅपचा होल्डर आहे. त्याने आतापर्यंत या हंगामाच्या 10 सामन्यांमध्ये 430 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे, ज्या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 आहे. तसेच शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्याने कॅप्शन सुद्धा दिलं आहे. ‘जे नेहमी उच्च विचार, मेहनत आणि अहंकार करत नाहीत, त्यांना नशीब आणि लोकांचं प्रेम’ भरभरून मिळत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

  दरम्यान, या पोस्टनंतर भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे. हरभजन सिंगने लिहिलं की, बरोबर म्हणालास…

  धवनच्या लव्ह स्टोरीत भज्जीची मोठी भूमिका

  क्रिकेटपटू हरभजन सिंगने शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्या प्रेमकथेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. भज्जीने धवन आणि आयेशाची भेट घडवून आणली होती. त्यामुळे धवनच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून भज्जीने गुगली टाकल्याचं दिसत आहे.