भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला द्या, शोएब अख्तरचा पाकच्या कॅप्टनला सल्ला…

सर्वात पहिले सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला दे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्राम हाताळण्यापासून थांबवा आणि तिसरा प्रयत्न असा करा की, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वत: मैदानात फलंदाजी करायला येणार नाही.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (रविवार) टी-२० वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. दोेन्ही संघ दुबईच्या मैदानात खेळण्यास सज्ज झाले आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या संघाबाबत मतं मांडली होती. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाला झोपच्या गोळ्या खायला द्या, अशा प्रकारचा सल्ला पाकचा कर्णधार बाबर आझमला दिला आहे.

    काय म्हणाला शोएब अख्तर ?

    सर्वात पहिले सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला दे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्राम हाताळण्यापासून थांबवा आणि तिसरा प्रयत्न असा करा की, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वत: मैदानात फलंदाजी करायला येणार नाही. कारण संपूर्ण जगभरातून सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी धोनी एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच तो चांगल्या फॉर्मात खेळत आहे. अशा प्रकारचा हास्यास्पद सल्ला शोएब अख्तरने दिला आहे.

    यानंतर शोएब अख्तरने गंभीर मुद्यांवर चर्चा केली. त्याने पाकिस्तानी फलंदाजांनी एक सल्ला दिला की, खेळाची सुरूवात चांगली करा. त्यांनी कमीत कमी डॉट बॉल खेळले पाहिजेत. त्यानंतर त्याने गोेलंदाजांना सल्ला दिला की, संपूर्ण गोल लक्षात घेऊन  अधिक आक्रमक होऊन गोलंदाजी करावी.