धक्कादायक! कोलांटी उडी मारणाऱ्या कबड्डीपटूचा मृत्यू

    तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुवन्नमलाई (Thiruvannamalai) जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील मरियममन मंदिरात (Mariyamman Temple Festival) आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोलांटी उडी मारून भाविकांचं मनोरंजन करणाऱ्या कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार (वय, ३४) असे मृत्यू झालेल्या कबड्डीपटूचे नाव असून तो मरियममन मंदिराच्या एका कार्यक्रमात कोलांटी उडी मारून तेथील भाविकांचं मनोरंजन करत होता. परंतु, कोलांटी उडी मारताना त्याच्या मानेला इजा झाली आणि तो जोरात जमीनीवर कोसळला. त्यानंतर तो उठलाच नाही. हे पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेले लोक त्याच्याजवळ गेले. दरम्यान, विनोदच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे समजताच नागरिकांना त्याला जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.