अय्यरने दिल्लीच्या कर्णधार पदाबाबत सोडलं मौन..

आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणे मला पसंत आहे. परंतु, रिषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्याच्या निर्णयाचा मी सन्मान करतो, असे श्रेयस अय्यर म्हणाला. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

    अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएलच्या १३ (IPL 2021) व्या हंगामात अंतिम सामन्यात मजल मारली होती. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या टप्प्यात अय्यर खेळू शकला नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने पंतला कर्णधार म्हणून नियुक्त केले. परंतु दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) संघाच्या कर्णधारपदाबाबत मौन सोडले आहे.

    आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणे मला पसंत आहे. परंतु, रिषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्याच्या निर्णयाचा मी सन्मान करतो, असे श्रेयस अय्यर म्हणाला. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. पहिल्या टप्प्यातील सामन्यांमध्ये मुकलेल्या श्रेयरस अय्यरने दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादविरोधात दमदार पुनरागमन केले आहे. अय्यर संघात परतला असला तरी संघ व्यवस्थापनाने पंतकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे.