शुभमन गिल पुढील ३ ते ४ सामन्यांमध्ये नसणार; बीसीसीआयने दिली माहिती

टीम इंडियाचा पुढील सामना हा अफगाणनिस्तान विरुद्ध होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल सध्या प्रकृतीच्या अस्वास्थामुळे संघाबाहेर आहे.

    मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत करीत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 200 धावांचे आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केले आहे. टीम इंडियाचे ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघे झीरोवर आऊट झाले. मात्र, विराट कोहली याने 85 आणि केएल राहुल याने नाबाद 97 धावा करुन टीम इंडियाला विजयी केले.

    आजारामुळे खेळता आले नाही

    वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्याला शुभमन गिल याला आजारामुळे खेळता आले नाही. त्यामुळे गिलच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली. शुभमनला आजारपणामुळे मुकावे लागल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला. आता बीसीसीआयने शुभमन गिल याच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.

    शुभमन गिल याच्याबाबत मोठी माहिती
    शुबमन गिल याला डेंग्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला नाही. आता टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. शुभमन गिल या सामन्यातूनही जवळपास बाहेरच झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करीत याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार गिल अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नसल्याचे एका अर्थाने म्हटले आहे.

    वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

    नेदरलॅंड संघ : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (सी आणि डब्ल्यूके), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन