शुभमन गीलचं वादळी शतक, बॉलर्सचीही दमदार कामगिरी; टीम इंडियाला मिळाला सर्वात चांगला विजय…

या विजयामुळे टीम इंडियानं (India) या सरिजमध्ये २-१ अशी आघाडी नोंदवलेली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियानं ४ विकेट गमावत २३४ रन्स केले होते. तर न्यूझीलंडनं पॉवर प्लेपर्यंतच ५ विकेट्स गमावले होते. न्यूझीलंडची टीम ६६ रन्समध्येच तंबूत परतली.

    अहमदाबाद– शुभमन गिलच्या (Shubman Gill) पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सेंच्युरीनं न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) तिसऱ्या मॅचमध्ये मोठा स्कोअर उभा केला. शुभमनच्या सेंच्युरीनं १६८ रन्सनं मात दिली आहे. टी-२० इंटरनॅशनल मॅचमध्ये हा टीम इंडियाच सर्वाधिक मोठा विजय आहे. तर न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी टीम इंडियानं आयर्लंडचा १४३ रन्सनी पराभव केला होता. या विजयामुळे टीम इंडियानं (India) या सरिजमध्ये २-१ अशी आघाडी नोंदवलेली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियानं ४ विकेट गमावत २३४ रन्स केले होते. तर न्यूझीलंडनं पॉवर प्लेपर्यंतच ५ विकेट्स गमावले होते. न्यूझीलंडची टीम ६६ रन्समध्येच तंबूत परतली.

    टीम इंडियाची खराब सुरुवात

    शुभमननं आपला फॉर्म कायम राखला आहे. त्यांना अवघ्या ६२ बॉल्समध्ये १२ फोर आणि ७ सिक्सच्या सहाय्याने १२६ रन्स केले. टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक मोठी इनिंग खेळल्याचा रेकॉर्डही शुभमननं आपल्या नावे केलाय. टॉस जिंकून बॅटिंगची निवड केलेल्या टीम इंडियाच सुरुवात चांगली झाली नव्हता. दुसऱ्या ओव्हरमध्येच इशांत किशन आऊट करण्यात न्यूझीलंडला यश आलं होतं.

    राहुल आणि गिलची झंझावाती खेळी

    त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी न्यूझीलंडला संधीच दिली नाही. या दोघांनीही ४२ रन्समध्ये ८२ रन्सची विक्रमी पार्टनरशीप केली. नंतर मात्र त्रिपाठी कॅचआऊट झाला. त्यानंतर गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी स्कोअर पुढे नेला. त्या दोघांनीही स्कोअर बोर्ड हलता ठेवला. सूर्यकुमारनंतर आलेल्या कॅप्टन हार्दिक पांड्यानंही यांत भरच घातली. अखेरीस भारतानं ४ विकेट्वर २३५ रन्सचं टार्गेट न्यूझीलंडला दिले होतं. तर टीम इंडियाच्या बॉलर्सनीही चांगली कामगिरी केली. हार्दिक पांडयानं ४, अर्शदीप, उमराव आणि शिवम यांनी २-२ विकेट्स घेतल्या