उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही? ‘या’ कारणामुळं…, कोच राहुल द्रविड काय म्हणाले?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामन्यासाठी जय्यत तयारी केली असताना, टिम इंडियासाठी तसेच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. उद्याच्या सामन्यात सलामीचा स्टार फलंदाज आणि यावर्षी खोऱ्याने धावा करणारा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

    चैन्नई – क्रिकेटच्या महासंग्रामाला तसेच आयसीसी वनडे वर्ल्डकपला (2023) पाच तारखेला सुरुवात झाली आहे. (Icc Cricket World Cup 2023) यात दोन दिवसांत अनेक महत्त्वाच्या संघाचे सामने पार पडले आहेत. तर उद्या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित भारताचा सलामीचा सामना कांगारुसोबत होणार आहे. टीम इंडिया (India) आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील आपल्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामन्यासाठी जय्यत तयारी केली असताना, टिम इंडियासाठी तसेच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. उद्याच्या सामन्यात सलामीचा स्टार फलंदाज आणि यावर्षी खोऱ्याने धावा करणारा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (Shubman Gill will not play in the match against Australia tomorrow due to ‘this’ reason…, what did coach Rahul Dravid say)

    शुबमन गिल याला डेंग्यू…

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शुबमन गिल याला डेंग्यु झाल्याचं वृत्त समोर आलं. गिलला डेंग्यू झाल्याची माहिती टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी दिली आहे. दुसरीकडे गिल खेळणार नसल्यामुळं क्रिकेटप्रेमीमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू हा आजारपणामुळे खेळणार नसल्याने टीम इंडियाची ताकद कमी झाल्याचं म्हटलं जात होतं. कारण शुभमन गिलने यावर्षी एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो भलताच फॉर्ममध्ये आहे. पण गिल आजारपणामुळं खेळणार नसल्यामुळं क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    गिलच्या जागी किशन की लोकेश?

    विश्वचषक स्पर्धेत उद्या भारताचा सलामीचा सामना कांगारुसोबत होणार आहे. या स्पर्धेआधी भारत आणि कांगारु यांच्याती ३ सामन्यांची मालिका पार पडली. यात भारताने कांगारुना २-१ अशी धूळ चारली. यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ उद्या भिडणार आहेत. पण उद्या जर गिल खेळणार नसेल तर त्याच्या जागी कोण खेळणार या चर्चांना उधाण आलं आहे. गिलच्या जागी इशान किशन किंवा लोकेश राहुल खेळू शकतात, असं बोललं जातंय, तर “ गिल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झालेला नाही. वैद्यकीय पथक शुभमनवर लक्ष ठेवून आहे. अजूनही आमच्याकडे 36 तासांचा कालावधी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी शुभमन खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल”, अशी माहिती प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली.