स्मृती मंधानाची नव्या विक्रमला गवसणी

    प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत(Commonwealth Games 2022) सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट (Cricket) संघाने स्पर्धेत आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. ‘अ’ गटात बार्बाडोसचा पराभव करून ऑस्ट्रेलियानंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने धडक दिली आहे. भारत विरुद्ध बार्बाडोस यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने बार्बाडोसवर १०० धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhan) हिने नव्या विक्रमला गवसणी घातली आहे.

    भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर स्मृती मंधानाने 2 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरलीय आहे. भारतासाठी रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम २ हजार धावांचा टप्पा गाठला होता. यानंतर या यादीत शिखर धवन (१ हजार ७५९ धावा), मिताली राज (१ हजार ४०७ धावा) आणि लोकेश राहुलचा (१ हजार ३९२ धावा) क्रमांक लागतो. याविक्रमामुळे स्मृतीने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याशी बरोबरी साधली आहे.

    बार्बाडोसला नमवत भारत उपांत्य फेरीत दाखल :
    भारताविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून बार्बाडोसच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने चार विकेट्स गमावून बार्बाडोससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघ केवळ 62 धावापर्यंतरच मज मारू शकला. या सामन्यात बार्बाडोसकडून किसिया नाइटने सर्वाधिक १६ धावांची खेळी केली. त्यानंतर बार्बाडोसच्या एकही फलंदाला १५ धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं बार्बाडोसला पराभव पत्कारावा लागला.
    बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ भारतीय महिला संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे, तेव्हा या स्पर्धेत भारतीय महिला संघ देशासाठी पदक जिंकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.