आतापर्यंत एका संघाने प्लेऑफमध्ये केला प्रवेश, दोन संघ आहेत बाहेर; इतर संघांची स्थिती जाणून घ्या

गुजरात टायटन्स IPL पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. हा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरला आहे.

    IPL-15: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईने चेन्नईवर 5 विकेट्सने मात करत प्ले ऑफ खेळण्याच्या त्यांच्या आशा भंगल्या. मुंबईचा संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत आतापर्यंत एकूण दोन संघांचे प्लेऑफ खेळण्याचे कार्ड कापले गेले आहे. त्याचवेळी, गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे.

    गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम आहे. लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे प्लेऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी आघाडीवर आहेत.