Spears team crowned champions in PYC HDFC Bank Racket League 2024

  पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत स्पिअर्स संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा 380-306 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
  रॉकेट्स संघाचा 176-144 असा पराभव
  सामन्यात टेबल टेनिसमध्ये रुचा अंबिके, अनिरुद्ध साठे, रोहन छाजेड, तुषार नगरकर, तेजस किंजवडेकर, ईशान लागु, ओंकार वैद्य, प्रियदर्शन डुंबरे, संजय शहा, कल्पक पत्की, अक्षय ओक, साकेत गोडबोले यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा 176-144 असा पराभव करून आघाडी घेतली.
  स्पिअर्स संघाने रॉकेट्स 30-21 ने केला पराभव
  बॅडमिंटनमध्ये ईशान लागु, तुषार नगरकर, अक्षय ओक, रोहीत मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, सौरभ प्रभुदेसाई यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा 174-141  असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. टेनिसमध्ये अभिषेक ताम्हाणे, अनिरुद्ध साठे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स 30-21 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
  पुरस्कार विजेत्या खेळाडूला 10,000रुपये
  स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय क्लबच्या सदस्य आशुतोष देशपांडे, राधिका देशपांडे यांचे वडील माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन, टेनिस, टेबलटेनिसमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार विजेत्या खेळाडूला 10,000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
  स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू , एचडीएफसी बँकेच्या रिटेल विभागाचे विभागीय प्रमुख राहुल कुलकर्णी, रिलेशनशिप बँकिंग विभागाचे मुख्य मनोज पहूजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, बॅडमिंटन व टेबलटेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, तुषार नगरकर, रणजित पांडे, दिप्ती सरदेसाई, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
  निकाल : अंतिम फेरी : 
  स्पिअर्स वि.वि.रॉकेट्स 380-306
  टेबल टेनिस: स्पिअर्स वि.वि.रॉकेट्स 176-144(अभिषेक ताम्हाणे/नकुल ओगले पराभुत वि.राहुल पाठक/तन्मय चोभे 16-30; रुचा अंबिके/अनिरुद्ध साठे वि.वि.केदार नाडगोंडे/आदित्य अभ्यंकर 30-25; रोहन छाजेड/तुषार नगरकर वि.वि.सिद्धार्थ निवसरकर/कौस्तुभ वळिंबे  30-17; तेजस किंजवडेकर/ईशान लागु वि.वि.सारंग देवी/अद्वैत जोशी 30-19; ओंकार वैद्य/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.राधिका इंगळहळीकर/निनाद देशमुख 30-27; संजय शहा/कल्पक पत्की वि.वि.तुषार मेंगळे/कुणाल एस 20-14; अक्षय ओक/साकेत गोडबोले वि.वि.राहुल मुथा/विराज खानविलकर 20-12);
  बॅडमिंटन : स्पिअर्स वि.वि.रॉकेट्स 174-141 (सुधांशु मेडसीकर/तेजस किंजवडेकर पराभुत वि.तन्मय चोभे/सिद्धार्थ निवसरकर 21-30; ईशान लागु/तुषार नगरकर वि.वि.राधिका इंगळहळीकर/केदार नाडगोंडे 30-19; अक्षय ओक/रोहीत मेहेंदळे वि.वि.कुणाल एस/अद्वैत जोशी 30-17; नकुल ओगले/नीरज दांडेकर वि.वि.आदित्य जितकर/राजश्री भावे 30-14; नेहा लागू/विश्वास मोकाशी पराभुत वि.निनाद देशमुख/तुषार मेंगळे 25-30; मंदार विंझे/गिरीश मुजुमदार पराभुत वि.पार्थ केळकर/आशुतोष सोमण 18-20;अभिषेक ताम्हाणे/सौरभ प्रभुदेसाई वि.वि.प्रांजली नाडगोंडे/सोहम कांगो 20-11);
  टेनिस : स्पिअर्स वि.वि.रॉकेट्स 30-21(अभिषेक ताम्हाणे/अनिरुद्ध साठे वि.वि.तन्मय चोभे/सारंग देवी 30-21);
  इतर पारितोषिके :
  सामनावीर: रुचा अंबिके व अनिरुद्ध साठे;
  मोस्ट व्हॅल्युएबल वूमन: राधिका इंगळहळीकर
  मोस्ट व्हॅल्युएबल सिनियर: संजय शहा
  बॅडमिंटन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: तन्मय चोभे
  टेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: सारंग देवी
  टेबलटेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: मिहीर ठोंबरे
  प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: अक्षय ओक