काश्मीरचा स्टार खेळाडू उमरान मलिकच्या नावावर खास रेकॉर्ड; टीम इंडियात संधी मिळणार?

दिवसेंदिवस काश्मीरचा स्टार खेळाडू उमरान मलिकची कामगिरी उत्तम होत असल्याचे दिसत आहे. अनेक दिग्गजांनी उमरानला टीम इंडियात संधी द्यावी, असे म्हटले आहे(Special record in the name of Kashmir's star player Umran Malik).

    मुंबई : दिवसेंदिवस काश्मीरचा स्टार खेळाडू उमरान मलिकची कामगिरी उत्तम होत असल्याचे दिसत आहे. अनेक दिग्गजांनी उमरानला टीम इंडियात संधी द्यावी, असे म्हटले आहे(Special record in the name of Kashmir’s star player Umran Malik).

    हैदराबादकडून खेळणाऱ्या बॉलरने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. यंदाच्या हंगामातील सर्वात लांब बॉल टाकला आहे. उमरानने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आणि त्याचे कौतुक होत आहे.

    हैदराबादकडून खेळणाऱ्या युवा बॉलरने यंदाच्या हंगामात सर्वात वेगाने बॉल फेकला. या बॉलचा वेग 154 किमी ताशी होता. याआधी त्याने 150 किमी ताशी वेगाने बॉल टाकला होता. चेन्नईच्या 10 व्या ओव्हरमध्ये उमरानने हा पराक्रम केला.

    या बॉलचा वेग इतका होता की फलंदाजी करत असलेला ऋतुराजही हैराण झाला. तो थेट कीपरच्या अंगावर गेला. उमरानचे 155 किमी ताशी वेगाने बॉल टाकण्याचे स्वप्न आहे.

    उमरानने आणि लॉकी फर्ग्युसन यंदाच्या हंगामातील सर्वात घातक आणि वेगाने बॉल टाकणारे गोलंदाज ठरले आहे. यामुळे बुमराहचे करिअर धोक्यात येणार का, अशी एक चर्चा आहे.