एसआरएच समोर १७८ धावांचे लक्ष्य, आंद्रे रसेलने सर्वाधिक ४९ धावा केल्या; उमरानने घेतले ३ बळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ४९ धावा केल्या. एसआरएचकडून उमरान मलिकने तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या शेवटच्या षटकात रसेलने तीन षटकार ठोकले. या षटकात २० धावा झाल्या.

    मुंबई – IPL २०२२ मध्ये शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकात ६ गडी गमावून १७७ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ४९ धावा केल्या. एसआरएचकडून उमरान मलिकने तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या शेवटच्या षटकात रसेलने तीन षटकार ठोकले. या षटकात २० धावा झाल्या.

    केकेआरची खराब सुरुवात
    व्यंकटेश अय्यरला मार्को यानसेनने ७ धावांवर बोल्ड केले. नितीश राणा २६ धावा करून उमरान मलिकच्या चेंडूवर शशांक सिंगने झेलबाद झाला. त्याच षटकात उमरानने अजिंक्य रहाणेलाही बाद केले. उमरानने त्याच्या पुढच्या षटकात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट घेतली.